०२ दिक्षित'स चे खरे रहस्य उलगडणार १५ जानेवारी७ रोजी
"९ स्टार प्राइम एन्टरटेन्मेंट" ची निर्मिती असलेला "७०२ दिक्षित'स" हा सनसनाटी थरारपट,
नवीन वर्षात, १५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत,
रोहित जाईल आणि प्रशांत उंब्राणी तर संकलक, दिग्दर्शक आहेत शंख राजाध्यक्ष.
काव्या आणि यश दीक्षित या कारीअरीस्ट, जोडप्याचे आणि त्यांच्या लहानग्या रेवाचे आयुष्य,
इतर कोणत्याही त्रिकोणी कुटुंबासारखे सुरळीत सुरू असताना, अचानक एक दिवस, रेवाचा
सांभाळ करणाऱ्या नोकराणीमुळे, पूर्ण दीक्षित कुटुंब प्रचंड अडचणीत सापडते, सर्वच घटनाक्रम,
यश दीक्षित यांच्या विरोधात घडत गेल्याने, ते कायद्याच्या कात्रीत पुरते सापडतात. काल
परवा पर्यंत आपल्यासारखेच भासणारे तिघांचे शांत कौटुंबिक भावजीवन, केवळ या एका
रहस्यमय घटनेमुळे पार ढासळून जाते. नक्की काय घडले असेल त्या दिवशी?, नेमके यश
दीक्षितच, अडचणीत का सापडले असतील? या थरारक घटनेमागे कोणते रहस्य दडले होते?या
घटनेचे मूळ, दीक्षित जोडप्याच्या वरकरणी आलबेल दिसणाऱ्या नातेसंबधांत तर लपले नव्हते
ना? की यशकडून नोकराणीवर अतिप्रसंग किंवा अत्याचार असे काही गूढ होते? शेवटी या
सनसनाटी थरारनाट्याचा शेवट कसा आणि कोण करते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट
पाहिल्यावरच मिळतील. अर्थात, एक लक्षात घ्या, हे असंच काहीं आपल्याही बाबतीत घडू
शकते.
चित्रपटातील भावनिक कल्लोळ, उत्कंठावर्धकरित्या घडणाऱ्या उलटसुलट घटना, आणि कथेला
मिळणारी आकस्मिक कलाटणी पाहताना एक प्रश्न नक्की पडतो, खरच जसं दिसत, तसंच
असत का?
प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात, गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, विजय
आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, रुची जाईल आणि विक्रम गोखले या अभिनेत्यांनी
विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे कथालेखन रोहित जाईल यांनी केले आहे, तर
पटकथालेखन केले आहे ऋतुराज धलगडे यांनी, हृषिकेश कोळी यांनी, चित्रपटासाठी संवाद
लेखन केले आहे. छायाचित्र दिग्दर्शन सांभाळले आहे सुरेश बीस्वेनी यांनी, कला दिग्दर्शक
आहेत अमित बेंबलकर, तर वेशभूषा साकारल्या आहेत अनिशा थापा यांनी, चित्रपटाचे कला
निर्माता आहेत जमशिद रूइन्टन.
चित्रपटातील, "विघ्नहर्ता", "जिंकून टाकू", आणि "जल्लोष" ही गीते प्रियंका बर्वे, हृषिकेश
रानडे, निमिषा देब, विश्वजीत बेंबलकर , स्वप्नजा लेले या पार्श्वगायकांनी गायली असून, डॉ.
राहुल देशपांडे, विशाल राणे यांनी गीतलेखन तर, पार्श्वसंगीत आणि या गीतांना स्वरसाज
चढवला आहे शुभंकर यांनी.
२२ डीसेंबर रोजी, चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉंच, तसेच म्युझिक लॉंच सोहळा संपन्न झाला.
For More information Contact: Amey : +91-9930985166

0 Comments